1500 पेक्षाजास्त मराठी उखाणे Marathi Ukhane For Male And Female

मित्रांनो लग्न असो किंवा मकर संक्रांती किंवा डोहाळे जेवण आपल्याला उखाणा घेतल्याशिवाय समारंभ संपन्न होत नाही तर आज मी तुम्हाला Marathi Ukhane, Marathi Ukhane Male, Romantic Marathi ukhane for female, Marathi ukhane Chavat, Funny Marathi UKhane, ukhane for bride सांगणार आहे

मराठी उखाणे
मराठी उखाणे

Romantic Marathi ukhane for female / Navriche ukhane

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे Romantic Marathi ukhane for female पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share these Marathi ukhane for female, modern marathi ukhane for female.

माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने
….राव आहेत सोबत,  मग मला कशाचे उणे 

तिळगुळाच्या संक्रांतीला, जमतो स्वादिष्ट मेळ
…रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ

रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा
….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा

सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
…रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ

उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव
आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव 

संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला
…रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला

तीळगुळाच्या देवघेवीने, दृढ जुळते नातं
….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांत

सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात
….रावांचे नाव घेते, ….च्या घरात 

marathi ukhane female
marathi ukhane female

आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा
….रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा

उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव
आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव

संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी
….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी 

मोत्याची माळ,  सोन्याचा साज
….रावांचे नाव घेते, मकर संक्रांंतीचा सण आहे आज 

गोऱ्या गोऱ्या हातावर, रेखाटली मेंदी
….रावांचे नाव घेण्याची, नेहमी मिळो संधी 

संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात
….रावांचे नाव ऐकायला बसले सगळे प्रकाशात 

पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे
…रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे

marathi ukhane for female in marathi
marathi ukhane for female in marathi

दोन जीवांचे मीलन जणू, शतजन्माच्या गाठी
…रावांचे नाव घेते , तुम्हा सर्वांसाठी!

तेल लावून,  कंबर माझी मोडली,
पाडव्याची ओवाळणी पाहता, कळी माझी खुलली

सासरची छाया,  माहरेची माया, 
….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया

गुढी पाडव्याच्या सणाला, कडूलिंबाचे पान 
…रावांचे रूप पाहून, झाले मी बेभान

मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर
…रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर

बहिणासारख्या नणंदा, भावासारखे दीर
…रावांचे नाव घ्यायला, पाडव्याला झाले मन अधीर

हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी, 
…रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी

माहेरची माया आणि माहेरची साडी
…रावांची आणि माझी पाडव्याच्या दिवशी जमली जोडी

marathi ukhane for female romantic
marathi ukhane for female romantic

पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी
…रावांमुळे आली, आयुष्याला गोडी

नववर्षाच्या शुभारंभासाठी येतो पाडवा
…रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा 

चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,  
…रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा 

घातली मी वरमाला, …रावांच्या गळी
पाडव्याच्या दिवशी येते गालावर लाली 

सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, 
…रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण

जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी
पाडव्याच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं
…रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं

नंदवनात असतात सोन्याची केळी
….रावांचे नाव घेते पाडव्याच्या सणाच्या वेळी

marathi ukhane for female
marathi ukhane for female

शेल्याशेल्याची बांधली गाठ
…रावांचे नाव मला अगदी तोंडपाठ 

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
…रावांचे नाव पाडव्याच्या दिवशी ओठावर येई

इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
…रावांचं नाव घेते….ची सून 

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने 
मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने 

लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
…रावांचे नाव घेते, पाडवा सणासाठी!

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, 
…रावांचे नाव घेते देवापुढे

संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा
…रावांचे नाव घेऊन,  आशिर्वाद मागते सौभाग्याचा  

सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी
…रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले
…रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले

बारीक मणी घरभर पसरले
…रावांसाठी मी माहेर विसरले 

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,
…रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट

smart marathi ukhane female
smart marathi ukhane female

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी
….रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी 

सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास
मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास

कपाळाचं कुंकू, जसा चांदण्याचा ठसा
…रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा

सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
….रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह 

महिन्यात असते कधी पुनव कधी अवस
….रावांचे नाव  घेते, आज मकर संक्रांतीचा दिवस 

मंगळागौरी माते, नमन करते तुला
….रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला 

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी
….रावांचं नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी 

गजाननाची कृपा, गुरूंचा आशिर्वाद
…रावांचे नाव घ्यायला मंगळागौरीच्या दिवशी करते सुरुवात 

ukhane in marathi for female marriage
ukhane in marathi for female marriage

संसाराच्या सागरात प्रीतीच्या लाटा
….रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा

नाव घ्या नाव,  सगळे झाले गोळा,
….रावांचं नाव आहे, एक लाख रूपये तोळा 

बागेमध्ये असतात, गुलाबाच्या कळ्या 
…रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या 

चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा
मी आहे म्हैस तर…राव आहेत रेडा 

रेशमाचा सदरा, त्याला प्लास्टिकचे बक्कल
आमचे…राव आहेत हँडसम, पण डोक्यावर मात्र टक्कल 

उंच उंच डोंगर हिरवे, त्याला टेकतं आभाळ,
….रावांचे नाव काय घेऊ…कपाळ???

पुरणपोळीत तूप असावे ताजे आणि साजूक
आमचे….राव तर आहेत खूपच नाजूक

एक होती चिऊ,  एक होता काऊ
….रावांचे नाव घेते, आता डोकं नका खाऊ

Marathi Ukhane for male / Navardevache ukhane

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे Romantic Marathi Ukhane for male पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share these Marathi Ukhane for male, modern New Ukhane for male.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल

 मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, … बरोबर बांधली जीवनगाठ.

उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार … च्या गळ्यात.

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.

 प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.

जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.

hindi ukhane for male
hindi ukhane for male

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.

marathi ukhane for male in english
marathi ukhane for male in english

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.

 चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.

निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.

 जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग,

marathi ukhane for male
marathi ukhane for male

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.

जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.

पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,

जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.

जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,

नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, … आज पासुन माझी गृहमंत्री.

काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात,

रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर … माझी प्यारी.

वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, … आहे माझी सर्वा पेक्षा,

चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी

 राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा घास,

निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.

मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

marathi ukhane male
marathi ukhane male

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात.

 ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………… चे नाव घेतो……..च्या घरात.

navardevache ukhane
navardevache ukhane

टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.

रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.

 निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.

 श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.

smart marathi ukhane male
smart marathi ukhane male

जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी,

उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी,

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.

लग्नाचा वाढदिवस करु साजरा, .. तुला आणला मोग-याचा गजरा.

सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.

पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे,

कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास

Modern Marathi ukhane For female

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे Modern Marathi ukhane For female पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share these gruhpravesh ukhane, navriche ukhane.

सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,
…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
…. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी

गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,
——राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी

आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
—— रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल

मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची मी सून

मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
——रावांचा संसार हा सुखाचा कळस

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

ukhane marathi for female
ukhane marathi for female

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
आणि …. रावांच्या घशात अडकला घास

लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती

चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

बारिक मणी घरभर पसरले,
….. रावांसाठी माहेर विसरले

ukhane marathi female
ukhane marathi female

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
——रावांचे नाव घेते ऐका सारेजण

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
…..रावांचे नाव घेते …..च्या दिवशी

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
….. रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल

पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
….. रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम,
….. रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम

मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,
….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
——रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात

ukhane in marathi for female
ukhane in marathi for female

एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
—— रावांची सारी माणसे मी आपली मानली

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
—— रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास

तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

काढ्यात काढा पाटणकर काढा,
—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
—— रावांचे नाव घेते—— ची मी सुन

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
—— रावांचे नाव घेते —— ची सून

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
—— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

ukhane in marathi for female new
ukhane in marathi for female new

सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
—– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश

अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले ——- रावांची सौभाग्यवती

सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
—— रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
—— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
—— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
——रावांना भरविते जिलेबिचा घास

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
—— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद

झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
—– राव सुखी रावो हीच आस मनाची

प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
—— रावांचे नाव घेऊन सोडले काकण

Marathi ukhane chavat

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे Marathi ukhane chavat पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share these marathi ukhane non veg.

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
***** रावं बिड्या पितात संडासात बसून

डाळित डाळ तुरीची डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

chavat ukhane
chavat ukhane

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
***** रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!

चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर

नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
***** चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका.

चांदिच्या परातीत केशराचे पेढे
आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.

साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
**** ने मला पावडर लाऊन फसवले

आंब्यात आंबा हापुस आंबा अन,
आमची **** म्हणजे जगदंबा

latest marathi ukhane
latest marathi ukhane

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
***** माझी बायको आहे मोठी लुच्ची

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते , नवरा माझा SECOND HAND.

यशोमती मैया से बोले नंदलाला
*** च नाव घेतो ,लाईफ झिंगालाला

marathi ukhane chavat
marathi ukhane chavat

भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
**** च्या जीवावर करते मी मजा

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर ,
श्याम रावांचे नाव घेते राम रावांची लव्हर

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
जेंव्हा आहेत ****राव , मग कशाला हवा हमाल

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
***** राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल

marathi ukhane for husband
marathi ukhane for husband

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

***रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!

Marathi Ukhane funny / Marathi ukhane comedy

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे marathi ukhane for female funny पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share thesemarathi ukhane for male funny, marathi ukhane comedy.

आला आला उन्हाळा ।
संगे घामाचा ह्या धारा — — — रावांचे नाव घेते
लावून AC चा थंड वारा


आज आहे शनिवार
उद्या येईल रविवार
— — — ची करते संसार
घडवू सुखाचा परिवार.

आघाडीत बिघाडी
युतीत चाललये कुस्ती
— — — रावांची कायमस्वरूपी
माझ्या हृदयात आहे वस्ती.

आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
— — — रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा

आज सुरु होईल IPL ची कम्माल
घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल
रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण
कारण — — — आणि माझ्यात सुरु होईल भांडण


comedy ukhane
comedy ukhane

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर
— — — याचं नाव घेते — — — रावांची लवर

लाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
— — — रावांशी लग्न करताच झाली मला ४ मुले

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
— — — घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!

स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल
….. राव एकदम ब्यूटिफुल

ईन मीन साडे तीन …
ईन मीन साडे तीन …
— — — माझा राजा ….
मी झाले त्याची QUEEN !

केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
— — — राव आहेत खूप हौशी ….

नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
….. बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार…..!!

funny ukhane in marathi for male
funny ukhane in marathi for male

जीवन आहे एक अनमोल ठेवा, — — — आणतात नेहमी सुकामेवा.

डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया — — — रावांना पहिल्यांदा बघताच
झाला मला लवेरिया

चंदनी पानात मुग्ध कळी हसली — — — रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

टिक टिक वाजते डोक्यात …
धड धड वाढते ठोक्यात ।
— — — रावांशी जुळली नाळ … संपेल अंतर झोक्यात

ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून
भरला १०० रु दंड …।
— — — रावां ना भरवते Icecream चा घास
सांगा आहे कि नाही थंड ?

टीप टीप बरसा पानी
पानी ने आग लगायी
— — — रावांशी लग्न करण्याची
लागली होती भलतीच घाई

funny ukhane
funny ukhane

खोक्यात खोका टिवी चा खोका,
….. माझी मांजर आणि मी तिचा बोका

लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!

कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… राव माझे आहेत फार निस्वार्थी

बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!

आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …
….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा

गोड करंजी सपक शेवाई ……
होते समजूतदार म्हणून …… करून घेतले जावई

चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

gruhpravesh ukhane
gruhpravesh ukhane

सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?

आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची……. म्हणजे जगदंबा

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर

नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा

महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड् …..
रावांना डोळे मारण्याची लई खोड्

अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका

marathi ukhane comedy
marathi ukhane comedy

पाव शेर रवा पाव शेर खवा
….. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी …..
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी

मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
….. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास

जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा

marathi ukhane for male funny
marathi ukhane for male funny

मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
….. च नाव घ्यायला मला नाही आळस्.

ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
….. ला पाहून माझ डोक दुखत.

नुकताच सचिन आलाय सेंचुरी मारून…..
अन बाबऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
…… राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात

शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
….. चे नाव घेते….. आमच्या प्रेमाला नाही कधी एंड…..

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड
….. रावांना भरवते Ice-cream चा घास सांगा आहे कि नाही थंड?

श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
….. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

Marathi Ukhane for bride

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे Marathi Ukhane for bride पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share theseukhane in marathi for female marriage, lagnachi ukhane.

Kolhapurla Aahe Mahalakmicha Vas, …… Mi Bharavito Jalebi Cha Ghas.

देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, … शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.

Puranpolit Tup Asave Sajuk, …… Aahet Aamchya Far Najuk.

स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.

Bhajit Bhaji Methichi, …………Majhya Pritichi.

काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, … सोबत जीवनात मला आहे आनंद.

Kahi Shabd Yetat Othatun, …..Cha Naav Yet Matra Hrudyatun.

lagnache ukhane
lagnache ukhane

नंदनवनात अमृताचे कलश, … आहे माझी खुप सालस.

भाजीत भाती मेथीची, … माझी प्रितीची,

श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण, … ला सुखात ठेवीन हा माझी पण.

दही चक्का तुप, … आवडते मला खुप.

नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, … राणी माझा तळहाताचा फोड.

देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन,

lagnachi ukhane
lagnachi ukhane

चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा, … रावाच्या जीवावर … मारते मौजा.

श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, … च्या सोबत आदर्श संसार करीन.

सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.

आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे… करी पुजन.

आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.

 हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, … झाली आता माझी सहचारिणी.

lagnatil ukhane
lagnatil ukhane

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
__ रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
__रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
__रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

 यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
__चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

 संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
__ रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

बारीक मणी घरभर पसरले, …. साठी माहेर विसरले.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
__ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.

 पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, …. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

marathi ukhane for bride
marathi ukhane for bride

लग्नात लागतात हार आणि तुरे,
… च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
… रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

 परसात अंगण, अंगणात तुळस,
…. नाव घ्यायचा मला नाही आळस.

जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला,
एवढे महत्त्व कशाला __च्या नावाला.”

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
… च्या साथीने आदर्श संसार करीन.

लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,
बदलावा लागतो स्वभाव,__ च्या घरी मिळेल
माझ्या कलागुणांना वाव.

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
__चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.

नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी
__च्या जीवनात__ही गृहिणी.

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
__मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

अथांग वाहे सागर संथ
चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो
__नी माझी जोडी.

चांदीचे जोडवे पतीची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची सून.

navin ukhane
navin ukhane

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
__ रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
….रावांच्या जीवनात टाकते मी पाहिले पाऊल.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
__रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

 रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
__रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

दारी होती तुळस, तिला घालते होते पाणी
आधी होते आई बाबांची तान्ही,
आता झाले __ची राणी.

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
__रावांचे नांव घेते, __च्या घरात.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
__रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
__रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
__ रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.

Makar Sankranti Marathi Ukhane

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे sankranti ukhane पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share these makar sankranti ukhane.

तिळाचा स्नेह गुळाची गोडी,
सदा सुखात राहो ……. जोडी.

तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत,
…….रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित.

नवीन वर्ष सण पहिला मकरसंक्रातीचा मान
हळदीकुंकूवाचा मान सुवासिनींचा.. आणि ………’चा जोडा राहो साताजन्माचा…

संक्रांतीचा जन्म माझा,….. रावांचे नाव घेवून वाटते तिळगुळाचा गोडवा.

makar sankranti ukhane

संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली …..रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली

 कुकू लावते ठळक हळद लावते किचीत ….. राव हेच माझे संचित

तिळगुळ घ्या गोडगोड बोला
—– शी लग्न झाले वर्ष झाले सोळा

अबोलीच्या मुग्ध काळ्या सांगून गेल्या मनीचे
…..च नाव घेते सानिध्य आहे मकरसंक्रांतीच्या हळदी कुंकवाचे…….???

तिळगुळ घ्या आली संक्रांत
— शी झाले लग्न स्वभावाने फारच शांत

तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कोणी
…….रावांची ……मी राणी

तिळगुळ घ्या आली संक्रांत
— शी झाले लग्न महाराष्ट्र माझा प्रांत

marathi ukhane for makar sankranti

समोर होती देवळी
देवळीत होते वाटी
वाटीत होते आवळा आवळी
…ने पीचर दाखवले पळवापळवी

यमुनेच्या पाण्यात ताजमहालाची सावली
—- ना जन्म देऊन धन्य झाली माउली

निसर्गाच्या सानिगध्यात निशीगंध झाला मोहीत ……रावांच आयुष्य मागीतले सासू सासऱ्या सहीत

तिळगुळ घ्या आली संक्रांत
— माझ्याबरोबर मला कसली भ्रांत

हिमालय पर्वतावर बरफाच्या राशि… रावाचं नाव घेते मकरसंक्रांति च्या दिवशी…

घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण ,
……रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण

तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा…
…..चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा..

मुकेश आंबानीच्या बायकोचा संक्रांतीचा उखाणा…….

तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान…
…चे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण…

रेडमी घ्या… ओप्पो घ्या….
की मोबाईल घ्या वीवो……..
.
.
.
.
मुकेशरावांचे नाव घेते फुकट वापरा जीओ…
???????

marathi ukhane for sankranthi

 संसारुपी सागरात पती असावे हौशी ……. राव च़ नाव घेते संक्रांतीदिवशी
??

तिळासारखा स्नेह. गुळासारखी गोडी. …..रावांच नाव घेते. सुखी असावी जोडी

नंदन वनात नाग नागिणीची वस्ती ……. राव यांना आयुष्य मागते माझ्या पेक्षा जास्ती

संसार रुपी करंजीत प्रेम रुपी सारण …….रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकू चे कारण

संक्रांतीच्या सणाला नटुन थटुन करते वानववसा
………रावांनी आनंद सुखाने भरुन दिला पसा

संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात ….रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात

माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची …
….रावांचे नाव घेतेय,संक्रांति च्या दिवशी.

हळदी कुंकु घेतले चाँदीच्या ताटी,
……. ची जोड़ी अशी जशा जुळून येती रेशीमगाठी।

ukhane for bride
ukhane for bride

सासु आहे प्रेमल ननंद आहे हौशी ….. रावांचे नाव घेते मकर संक्रांति च्या दिवशी.

कोल्हापूरचा चिवडा,
लोणावळ्याची चिक्की,
……रावासमोर सर्व दुनिया फिकी.

हिवाळ्यात लागते थंडी, उन्हाळ्यात लागते ऊन…… रावांच नाव घेते …..सुन..

हिमालय पर्वतावर बरफाच्या राशि… रावाचं नाव घेते मकरसंक्रांति च्या दिवशी…

मंगलकार्याची खूण म्हणजे दाराला तोरण…
…रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण

पेरूच्या झाडावर पोपट बसले पंगतीला,
……रावांचे नाव घेते,
सुहासिनीच्या संगतीला

नाव घ्या. नाव घ्या. आग्रह. असतो सर्वाचा,
….. रावांचे नाव. असते. ओठावर. पण प्रश्न. असतो. उखाण्याचा

वाण घ्या वाण संक्रांतीचे वाण…..
…..रावामुळे मिळतो हळदी कुंकुवाचा मान

उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टाकते केळीला …..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळेला

रुसलेल्या राधेला क्रीषण म्हणते हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास.

गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत
…..रावांच नाव घेते संक्रातच्या पुजेत

निसर्ग निर्मिती च्या वेळी
सूर्यनारायण झाले माळी
——- चे नाव घेते संक्रातीच्या वेळी

तुमच्या जवळ आणखी  Marathi Ukhaneअसतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात add करू.

आता marathi ukhane for female for Whatsapp and Facebook सर्व marathi ukhane for male व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील modern marathi ukhane for female इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात.

तुमच्या जवळ आणखी navriche ukhane, marathi ukhane for female असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद् ‍‍

आम्हाला आशा आहे की Marathi ukhane for female, marathi ukhane funny तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग family, मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment