संक्रांती ऊखाणे | Sankranti Ukhane | Marathi UKhane For Sankranti

This is the latest and updated collection of  संक्रांती ऊखाणे, Sankranti Ukhane, Marathi Ukhane For Makar Sankranti, मकर संक्रांतीचे उखाणे. You can also use this Message as WhatsApp status because this  Makar Sankranti Marathi Ukhane, मकरसंक्रांती उखाणे, Makar Sankranti Special Ukhane, मकर संक्रांत विशेष उखाणे language only.

संक्रांती ऊखाणे | Sankranti Ukhane

नववर्षाच्या शुभारंभासाठी येतो पाडवा
…रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा 

पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी
…रावांमुळे आली, आयुष्याला गोडी

शेल्याशेल्याची बांधली गाठ
…रावांचे नाव मला अगदी तोंडपाठ 

चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,  
…रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा 

इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
…रावांचं नाव घेते….ची सून 

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
…रावांचे नाव पाडव्याच्या दिवशी ओठावर येई

लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
…रावांचे नाव घेते, पाडवा सणासाठी!

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने 
मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने 

Sankranti Marathi Ukhane
Sankranti Marathi Ukhane

घातली मी वरमाला, …रावांच्या गळी
पाडव्याच्या दिवशी येते गालावर लाली 

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, 
…रावांचे नाव घेते देवापुढे

जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी
पाडव्याच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, 
…रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण

नंदवनात असतात सोन्याची केळी
….रावांचे नाव घेते पाडव्याच्या सणाच्या वेळी

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं
…रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं

Marathi Ukhane For Makar Sankranti | मकर संक्रांतीचे उखाणे 2022

तिळगुळाच्या संक्रांतीला, जमतो स्वादिष्ट मेळ
…रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ

माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने
….राव आहेत सोबत,  मग मला कशाचे उणे 

सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
…रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ

उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव
आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव 

रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा
….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा

तीळगुळाच्या देवघेवीने, दृढ जुळते नातं
….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांत

संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला
…रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला

संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा
…रावांचे नाव घेऊन,  आशिर्वाद मागते सौभाग्याचा  

सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात
….रावांचे नाव घेते, ….च्या घरात

Marathi UKhane For Sankranti
Marathi UKhane For Sankranti

जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले
…रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले

सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी
…रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,
…रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट

बारीक मणी घरभर पसरले
…रावांसाठी मी माहेर विसरले 

Makar Sankranti Marathi Ukhane | मकरसंक्रांती उखाणे 2022

उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव
आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव

आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा
….रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा

मोत्याची माळ,  सोन्याचा साज
….रावांचे नाव घेते, मकर संक्रांंतीचा सण आहे आज 

संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी
….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी 

संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात
….रावांचे नाव ऐकायला बसले सगळे प्रकाशात 

गोऱ्या गोऱ्या हातावर, रेखाटली मेंदी
….रावांचे नाव घेण्याची, नेहमी मिळो संधी 

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी
….रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी 

पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे
…रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे

कपाळाचं कुंकू, जसा चांदण्याचा ठसा
…रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा

सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास
मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास

महिन्यात असते कधी पुनव कधी अवस
….रावांचे नाव  घेते, आज मकर संक्रांतीचा दिवस 

सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
….रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह 

Makar Sankranti Special Ukhane | मकर संक्रांत विशेष उखाणे 2022

तेल लावून,  कंबर माझी मोडली,
पाडव्याची ओवाळणी पाहता, कळी माझी खुलली

दोन जीवांचे मीलन जणू, शतजन्माच्या गाठी
…रावांचे नाव घेते , तुम्हा सर्वांसाठी!

गुढी पाडव्याच्या सणाला, कडूलिंबाचे पान 
…रावांचे रूप पाहून, झाले मी बेभान

सासरची छाया,  माहरेची माया, 
….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया

बहिणासारख्या नणंदा, भावासारखे दीर
…रावांचे नाव घ्यायला, पाडव्याला झाले मन अधीर

मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर
…रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर

माहेरची माया आणि माहेरची साडी
…रावांची आणि माझी पाडव्याच्या दिवशी जमली जोडी

हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी, 
…रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी संक्रांती ऊखाणे, Sankranti Ukhane, Marathi Ukhane For Makar Sankranti, मकर संक्रांतीचे उखाणे असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद

Please :- आम्हाला आशा आहे की Makar Sankranti Marathi Ukhane, मकरसंक्रांती उखाणे, तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका

नोट : Makar Sankranti Special Ukhane, मकर संक्रांत विशेष उखाणे या आजच्या पोस्टमध्ये दिलेले इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment