500 Good night quotes in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून good night quotes in marathi, good night quotes marathi, good night marathi quotes, शुभ रात्री शुभेच्छा संदेश आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे good night quotes in marathi for girlfriend कलेक्शन आवडल असेल, जर शुभ रात्री शुभेच्छा मराठी स्टेटस आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Good night quotes in Marathi

आयुष्यात समोर आलेली,
आव्हाने जरूर स्वीकारा..
कारण त्यातुन तुम्हाला,
एक तर विजय प्राप्ती मिळेल,
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल…!
शुभ रात्री !

हसता हसता सामोरे जा आयुष्याला,
तरच घडवू शकाल भविष्याला,
कधी निघुन जाईल “आयुष्य” कळणार नाही,
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही…
शुभ रात्री !

जर नशीब काही “चांगले” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते..
आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते…!
शुभ रात्री !

marathi good night quotes
marathi good night quotes

विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल..
परंतु खरा योद्धा तोच,
जो पराजय होणार हे माहित असूनही,
जिंकण्यासाठी लढेल…
शुभ रात्री !

नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं,
कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं,
हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं,
कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं…
शुभ रात्री !

आयुष्यात समजा आपण,
एखाद्या गोष्टीत हरलो तर,
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,
जिंकण्याची इच्छा नसणं,
ही भावना जास्त भयंकर असते…
प्रयत्न करत रहा.
शुभ रात्री !

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधरण्याची संधी देते…
शुभ रात्री !

Good night quotes Marathi

समुद्रातलं सगळं पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज,
बुडवल्याशिवाय राहत नाही..
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही…
शुभ रात्री !

एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
शुभ रात्री !

रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही..
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,
त्यांनाच यश प्राप्त होते…
शुभ रात्री !

कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते,
दुःख असूनही दाखवायचे नसते,
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत आणखी हसायचे असते…
शुभ रात्री !

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
शुभ रात्री !

Read This Also :

Good night quotes in Marathi

Good morning quotes in marathi

good night quotes marathi
good night quotes marathi

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !

कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि,
“शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण,
मी अजुन जिंकलेलो नाही”
शुभ रात्री !

स्वतःच्या जीवावर
जगायला शिका..
थोडीशी फाटेल
पण अभिमान वाटेल…!
शुभ रात्री !

Good night Marathi quotes

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष
करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो…
शुभ रात्री !

यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने
लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.
शुभ रात्री !

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप,
संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खुप नशीबवान समजा..
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त,
त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते…
शुभ रात्री !

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,
काल आपल्याबरोबर काय घडलं
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा…
कारण आपण फक्त,
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलोय…
शुभ रात्री !

मनाने इतके चांगले राहा की,
तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..
रडला पाहिजे…
शुभ रात्री !

good night quotes in marathi
good night quotes in marathi

सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री !

बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही,
पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे..
आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही,
पण तो जगामध्ये बुद्धिवान होता..
कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही..
देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका..!
शुभ रात्री !

किंमत पैशाला कधीच नसते..
किंमत पैसे कमावतांना केलेल्या,
कष्टाला असते…
शुभ रात्री !

परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार
घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.
हे कलयुग आहे..
इथे खोट्याला स्वीकारलं जातं,
आणि खऱ्याला लुटलं जातं…
शुभ रात्री !

खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
शुभ रात्री !

फांदीवर बसलेल्या पक्षाला
फांदी तुटण्याची भीती नसते,
कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून,
आपल्या पंखावर विश्वास असतो…
शुभ रात्री !

या जगात सगळ्या गोष्टी सापडतात.
पण.. स्वतःची चूक कधीच सापडत नाही…
शुभ रात्री !

Good night quotes in Marathi for girlfriend

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,
परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते…
शुभ रात्री !

खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार
नेहमी चांगला असतो…
शुभ रात्री !

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”
शुभ रात्री !

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…
शुभ रात्री !

कोणी आपल्याला फसवलं
या दुःखापेक्षा,
आपण कोणाला फसवलं नाही,
याचा आनंद काही वेगळाच असतो…
शुभ रात्री !

स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत…
शुभ रात्री !

दुःखात देवाला आठवण्याचा हक्क,
त्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..
आभार मानलेले असतात…
शुभ रात्री !

good night quotes in marathi language
good night quotes in marathi language

स्वप्न असं बघा,
जे तुमची झोप उडवून टाकेल..
आणि, एवढं यश मिळवण्याचा
प्रयत्न करा कि,
टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे…
शुभ रात्री !

खूप Strong असतात
ती लोकं.
जे सर्वांपासून लपून,
एकट्यात रडतात…
शुभ रात्री !

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!!
शुभ रात्री !

ठेच तर लागतच राहिल,
ती सहन करायची हिंमत ठेवा,
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
माणसांची किंमत ठेवा…
शुभ रात्री !

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…
शुभ रात्री !

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..!
शुभ रात्री !

कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…
शुभ रात्री !

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…
शुभ रात्री !

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे…!
शुभ रात्री !

Good night motivational quotes in marathi

संयम ठेवा,
संकटाचे हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…
शुभ रात्री !

विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो…!
शुभ रात्री !

सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो…
शुभ रात्री !

जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!
शुभ रात्री !

good night marathi quotes
good night marathi quotes

विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,
कि तो परत कधीच बसत नाही…
शुभ रात्री !

सरडा तर नावाला बदनाम आहे,
खरा रंग तर माणसं बदलतात…
शुभ रात्री !

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय…
शुभ रात्री !

वाघ जखमी झाला तरी,
तो आयुष्याला कंटाळत नाही..
तो थांबतो, वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..
घेऊन, तीच दहशत.. अन तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो..
शुभ रात्री !

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…
शुभ रात्री !

जगात करोडो लोक आहेत,
पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण…
“देव तुमच्या कडून,
काही अपेक्षा करत आहे,
जी करोडो लोकांकडून,
पूर्ण होण्याची शक्यता नाही”
स्वतःची किंमत करा…
तुम्ही खूप मौल्यवान आहात!
शुभ रात्री !

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ रात्री !

कोणावर इतका भरोसा
ठेऊ नका कि,
स्वतःचा आत्मविश्वास,
कमी पडेल…
शुभ रात्री !

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात…
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो…
शुभ रात्री !

पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
शुभ रात्री !

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…
शुभ रात्री !

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,
पण कौतुक हे स्मशानातच होतं…
शुभ रात्री !

आम्हाला आशा आहे की good night quotes in marathi, good night quotes marathi, शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश मराठीमध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग good night quotes in marathi for girlfriend share करायला विसरु नका.

Read This also

Good Night Message In marathi

1 thought on “500 Good night quotes in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश”

Leave a Comment