450 नवरी मुलीचे उखाणे Marathi Ukhane for Female

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Romantic Marathi Ukhane for Female, नवरी मुलीचे उखाणे,  Navariche Ukhane, नवरी मुलीचे उखाणे, Romantic Marathi Ukhane for Female संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Navariche Ukhane कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in ला आवशय भेट दया

Marathi Ukhane for Female

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी

जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,
….. रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
….. रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती

marathi ukhane for female romantic

मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची मी सून

सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,
….. रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान

ukhane in marathi for female marriage

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

marathi ukhane female
marathi ukhane female

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
…. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी

भोळ्या शंकराला बेलाची आवड,
….. रावांची पती म्हणून केली मी निवड

marathi ukhane female

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,
….. रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
…. रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास

रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा,
….. रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा

ukhane marathi female

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

एक तीळ सातजण खाई,
…. रावांना जन्म देणारी धन्य ती आई

सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

marathi ukhane for female in marathi
marathi ukhane for female in marathi

गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती

फुलले गुलाब गाली, स्पर्शात धुंद झाली प्रीती,
….. रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती

सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,
…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

smart marathi ukhane female

माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी

शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
….. रावांच्या प्राप्तीने माझे, भाग्य उदयाला आले

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

long marathi ukhane for female

दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी,
….. रावांचे नाव घेते, खास तुमच्या आग्रहासाठी

Navariche Ukhane

marathi ukhane for female romantic
marathi ukhane for female romantic

बारिक मणी घरभर पसरले,
….. रावांसाठी माहेर विसरले

लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
आणि …. रावांच्या घशात अडकला घास

एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती

ukhane in marathi for female new

चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

marathi ukhane for female
marathi ukhane for female

गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

marathi ukhane for female in marathi

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी,
….. रावांचे नाव घेऊन, बांधते मुंडावळी

पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
….. रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

marathi ukhane for female satyanarayan pooja

शिवाजी राजांनी किल्ला जिंकला, शक्ति पेक्षा युक्ति ने,
…. रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
….. रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल

मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,
….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

नवरी मुलीचे उखाणे

smart marathi ukhane female
smart marathi ukhane female

तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास

एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
—— रावांची सारी माणसे मी आपली मानली

latest ukhane in marathi for female

संकेताच्या मिलनाकरीता नयन माझे आतुरले,
….. रावां ची मी आज सौभाग्यवती झाले

लग्नासारख्या मंगलदिनी नका कोणी रुसू,
….. रावां ना घास देताना येते मला गोड हसू

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
….. रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून

navri ukhane

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
—— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ,
….. रावां मुळेच आला माझ्या जीवनाला अर्थ

ukhane in marathi for female marriage
ukhane in marathi for female marriage

सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
—— रावांचे नाव घेते —— ची सून

तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद,
माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात,
….. रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात

navariche ukhane

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
—– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश

काचेच्या बशीत बदामचा हलवा,
….. रावांचे नाव घेते, सासुबाईंना बोलवा

अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा,
…..रावांच्या नावाने भरते लग्नाचा हिरवा चुडा

ukhane navriche

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना

नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
….. च्या घराण्यात ….. रावांची झाले महाराणी

काढ्यात काढा पाटणकर काढा,
—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

Romantic Marathi Ukhane for Female

ukhane in marathi for female new
ukhane in marathi for female new

सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
—— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात

झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
—– राव सुखी रावो हीच आस मनाची

काव्य आणि कविता, सागर आणि सरिता,
….. रावांचे नाव घेते, खास तुमच्या करिता

लग्नातील उखाणे

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
—— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
—— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद

साँजवात लावताना येते माहेरची आठवण,
….. रावांसाठी झाली माझी सासरी पाठवण

लग्नातील उखाणे नवरीचे

हरीश्रंद्र राजा, रोहिदास पुत्र,
….. रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र

सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
—— रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान,
….. रावांची राणी झाले, आहे मी भाग्यवान

ukhane in marathi for female
ukhane in marathi for female

मंद मंद वाहे वारा, संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो …..रावां आणि …..ची जोडी

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
—— रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
—— रावांचे नाव घेऊन सोडले काकण

लग्नातील उखाणे नवरदेव नवरीचे

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,
….. रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
—— रावांचे नाव घेते—— ची मी सुन

साता जन्माच्या जुळल्या गाठी,
….. रावांचे नाव घेते चालताना सप्तपदि

सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
——रावांचे नाव घेते ऐका सारेजण

लग्नाचे उखाणे

जाईजुईचा वेल पसरला दाट,
…..रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
——रावांना भरविते जिलेबिचा घास

ukhane marathi for female

ukhane marathi female
ukhane marathi female

मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
——रावांचा संसार हा सुखाचा कळस

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
——रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात

काचेच्या बशीत आंबे ठेवले कापुन,
….. रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन

मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,
——राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी

मराठी उखाणे नवरी साठी 2021

निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे,
….. रावांच्या संगतीने उजलेल् माझे जीवन सारे

मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून,
—- राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून

आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
—— रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल

ukhane marathi for female
ukhane marathi for female

विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,
….. रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष

ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,
….. राव आणि माझी जोडी ठेव सुखात

शंकरासारखा पिता, अन गिरिजॆसारखी माता,
….. रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता

ukhane navriche marathi

शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले,
….. रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले

उखाणा घे उखाणा घे, करू नका गलबला,
पूर्वपुण्याईने ….. रावां सारखे पती लाभले मला

जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते,
सगळ्यांचा मान राखून नाव ….. रावांचे घेते

वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,
….. रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा

चंद्राला रोहिणी भेटे आकाशी,
…..रावां चे नाव घेते लग्नाच्या दिवशी

आता Romantic Marathi Ukhane for Female व Male कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील Navariche Ukhane इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात.

तुमच्या जवळ आणखी Romantic Marathi Ukhane for Female, Navariche Ukhane असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद् ‍‍

आम्हाला आशा आहे की ukhane in marathi for female, marathi ukhane for female funny तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग family, मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Read This Also :

Marathi Ukhane For Bride

Birthday wishes for grandfather in Marathi

Marriage wishes in Marathi

Leave a Comment