500+ Good morning quotes in Marathi | सुप्रभात मराठी संदेश

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून good morning quotes in marathi, good morning quotes in marathi with images, morning quotes in marathi, शुभ सकाळ सुविचार आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे good morning quotes marathi images कलेक्शन आवडल असेल, जर शुभ सकाळ सुविचार मराठी आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Good morning Quotes marathi | सुप्रभात मराठी संदेश

सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे,
तो खरा श्रीमंत..!
Good Morning Have A Nice Day!

माणूस जेवढा आजाराने
थकत नाही,
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो,
म्हणून हसत रहा,
विचार सोडा,
आपण आहात तर जीवन आहे,
हीच संकल्पना मनी बाळगा. शुभ सकाळ!

जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
आश्रू आणि हास्य..
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
शुभ सकाळ!

मला हे माहीत नाही की,
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात..
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमळ आठवणीने  शुभ सकाळ 

आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा कि,
निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,
जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!
शुभ सकाळ!

good morning quotes marathi images

good morning quotes in marathi with images
good morning quotes in marathi with images

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं..
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं,
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते  !! शुभ सकाळ !! 

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील..
शुभ सकाळ!

चांगले मन व चांगला स्वभाव,
हे दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात..
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती,
आयुष्यभर टिकतात. शुभ सकाळ !

Good morning quotes in Marathi for WhatsApp | गुड मॉर्निंग मराठी

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..
शुभ सकाळ !

मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात..
सुप्रभात!

मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते..
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो ! शुभ सकाळ !

लोक म्हणतात,
आयुष्य छोटं आहे..!
पण असं बिलकुल नसतं..
खरं सांगू,
आपण फक्त जगायलाच
उशिरा सुरवात करतो..!!
Good Morning !!

good morning quotes marathi images

आयुष्यातील कुठली भेट
शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!
म्हणून घेतला जाणारा
प्रत्येक निरोप असा घ्या कि,
त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..
सुप्रभात!

good morning quotes in marathi
good morning quotes in marathi

चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं
महत्वाची असतात..
कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..
चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही..
शुभ सकाळ!

कोण हिशोब ठेवणार
कोणाला किती दिले आणि
कोणी किती वाचवले..
म्हणून ईश्वराने सोप्पा उपाय केला..
सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले,
आणि रिकाम्या हातानेच बोलावले..
शुभ प्रभात !

मी तुमच्या आयुष्यातला
तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी,
आशा करतो की,
जेव्हा केव्हा आठवण येईल,
तेव्हा नक्की म्हणाल,
इतरांपेक्षा वेगळा होतो

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
वाईट वेळेत साथ सोडलेल्या
लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन
चांगली वेळ आणून दिली,
त्यांचे मोल कधी विसरू नका

good morning quotes marathi love shayari

शुभ सकाळ!
खरी नाती तीच जी
रुसतात रागावतात
पण साथ कधीच सोडत नाहीत..
सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

सकाळी सकाळी,
मोबाईल हातात घेतल्यावर,
ज्यांचा विचार मनात येऊन,
गालावर छोटसं हसू येतं,
अशा प्रेमळ माणसांना, सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

Morning quotes in marathi | गुड मॉर्निंग मेसेज मराठी

रस्त्याने जातांना येणारी
माझी शाळा मला विचारते,
जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना?
मी उत्तर दिले,
आता फक्त दफतर खांद्यावर नाही एवढंच..
बाकी, अजूनही लोक धडा शिकवून जातात..

गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..
शुभ सकाळ!

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते..
म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा,
आयुष्य खूप आनंदात जाईल..
शुभ सकाळ !

एखाद्या सोबत हसता-हसता,
तितक्याच हक्काने
रुसता आलं पाहिजे…..
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी,
अलगद टिपता आलं पाहिजे..
नात्यांमध्ये मान-अपमान कधीच नसतो,
फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे  !! शुभ सकाळ !! 

good morning quotes marathi love shayari

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..
सुप्रभात!

मैत्री अशी करा,
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहिजे..
शुभ सकाळ!

जगातील कुठल्याही तराजूत
मोजता ना येणारी एकमेव वस्तू
म्हणजे मैत्री..
शुभ सकाळ !

ज्याला संधी मिळते,
तो नशिबवान..
जो संधी निर्माण करतो,
तो बुध्दिवान..
पण जो संधीचे सोने करतो,
तोच विजेता..
आनंद शोधू नका,
निर्माण करा..
शुभ सकाळ

morning quotes in marathi
morning quotes in marathi

मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ!

संयम ठेवा संकटाचे
हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला
पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील..
Good Morning 

Good morning quotes marathi images | शुभ सकाळचे मेसेज

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात..
शुभ सकाळ !

हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावं लागतं..
कसं आहे विचारलं तर,
मजेत आहे म्हणावं लागतं..
जीवन हे एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं..
शुभ प्रभात

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ!

beautiful good morning quotes marathi

खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,
पण मनाने श्रीमंत नक्की बना..
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी,
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..
शुभ सकाळ

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
शुभ सकाळ !

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात..
शुभ सकाळ!

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..
शुभ सकाळ!

यशस्वी आयुष्यापेक्षा,
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..
कारण,
यशाची व्याख्या लोकं ठरवितात,
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो..
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!

माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,
पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,
आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..
शुभ सकाळ!

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..
शुभ सकाळ!

शुभ सकाळ सुविचार
शुभ सकाळ सुविचार

काल आपल्याबरोबर काय घडलं,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे?
याचा विचार करा..
कारण आपण फक्त
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,
तर उरलेले दिवस
आनंदाने घालवायला जन्माला आलोय..
Good Morning

Gm quotes in marathi | गुड मॉर्निंग स्टेटस मराठी

शुभ सकाळ!
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी.

लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं..
काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची..
Good Morning!

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

जगा इतकं कि,
आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल..
काही मिळो अथवा
नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल.
शुभ सकाळ!

या जगात सगळ्या
गोष्टी सापडतात,
पण स्वतःची चुक
कधीच सापडत नाही..
अणि ज्या दिवशी
ती सापडेल त्या दिवसापासून
आयुष्य बदलून जाईल..
शुभ सकाळ 

romantic good morning quotes marathi

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
!! शुभ सकाळ!!

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.  शुभ सकाळ 

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.

motivational good morning quotes marathi

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!! शुभ सकाळ 

चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे..
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगलं आहे..
प्रभाव चांगला असण्यापेक्षा,
स्वभाव चांगला असणे,
महत्वाचे आहे..
!!सुप्रभात!!

जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो..
शुभ सकाळ!

Shubh sakal quotes in marathi | प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी

शुभ सकाळ!
नाती हि फुलपाखरा सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
सैल सोडलीत तर उडून जातात..
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात

शुभ सकाळ म्हणजे,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला, थोडासा वेळ..!!  !! शुभ सकाळ !! 

Good MorninG
खुपदा ठरवूनही
मनासारखं जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
मन वाहून जातं…!
शुभ सकाळ!

!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही

दुसऱ्याचं मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही !! शुभ सकाळ !! 

inspirational good morning quotes marathi

आमच्या घरात देवघर आहे
असे म्हणण्यापेक्षा,
देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो,
ही भावना असावी..
देवाने आपल्याला
काहीतरी दिलं पाहिजे,
म्हणून मंदिरात जाऊ नये..
तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

रोजच “शुभ सकाळ” म्हटल्यावर,
दिवस चांगला जातो असे काही नाही,
किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही..
पण शुभ सकाळ पाठवतांना आपण ज्यांना पाठवतो,
ती व्यक्ती डोळ्यासमोर येते..
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास  सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही.. !! शुभ सकाळ !! 

नातं आपुलकीचं असावं,
एकमेकांना जपणारं असावं..
जवळ असो वा लांब,
नेहमी आठवणीत राहणारं असावं…! शुभ सकाळ

आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
शुभ सकाळ!

शुभ सकाळ म्हणजे,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे,
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे

आम्हाला आशा आहे की good morning quotes in marathi, good morning quotes in marathi with images, शुभ सकाळ सुविचार मराठीमध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग good morning quotes marathi images share करायला विसरु नका.

Read This Also

Good Morning status Marathi

Leave a Comment