40 पेक्षाजास्त व. पु. काळे यांचे कोट्स | v pu kale quotes in Marathi Best

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून v pu kale quotes in Marathi, Va. Pu. Kale Quotes On Life In Marathi, Vasant Purushottam Kale Thoughts in Marathi, व. पु. काळे यांचे कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे v pu kale quotes in Marathi कलेक्शन आवडल असेल, जर Vasant Purushottam Kale Thoughts in Marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Va. Pu. Kale Quotes On Life In Marathi

संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की, माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करत नाही

कितीकदा कडाडून एकमेकांशी भांडलो,
एकमेकांना सोडून नाही कुठे रमलो

वैयक्तिक टीकास्पद सवयी समजासाठी सोडायच्या असतात. तेव्हा सभ्यतेच्या मर्यादा इतरांसाठी पाळायच्या नसतात

स्वतःचं स्वतःचं घर सांभाळायचं हे मला गोगलगाईने सांगितलं

सर्वात सूक्ष्म काही असेल तर विचारच.
म्हणून अस्वस्थ, उद्धस्त करण्याची त्याची शक्ती अफाट

कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही

v pu kale quotes in Marathi

माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि  दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचं कौतुक करते

जन्माला आला तो वंशाचा दिवा झाला,
पहिल्याच दिवशी त्याला जबाबदारीचा शिक्का लागला 

relationship v pu kale quotes in marathi
relationship v pu kale quotes in marathi

माणूस निराळा वागतोय तो कामातून गेला असं आपण पटकन बोलतो. पण तसं नसतं या सगळ्याचा अर्थ तो फक्त आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो

सतत वाहतं राहिलं की जवळ काही उरत नाही 

विरोधक एक असा गुरू आहे जो तुमच्यातील कमतरता परिणामांसह दाखवून देतो

जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं.
बसणाऱ्यानं शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं,
यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
ऊब हवी की चटके हवेत हे
ज्याचं त्याने ठरवायचं असतं

विचाराइतकं देखणं दुसरं काहीही नाही

अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत
असला तरीही प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं

काही काहींना खुद्ध स्वतःच्या मनाचीच मागणी कळत नाही

Vasant Purushottam Kale Thoughts in Marathi

स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस हा स्वतःच एक खणखणीत नाणं असतो

आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की धकाधकीची वाटचाल ही सरळ वाटते. निखारे सौम्य होतात. काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं सोपं सोपं होऊन जातं

ऐश्वर्य आणि सौंदर्य यांना मदत करायला सगळेच झटत असतात

तासनतास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत. पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे या जाणीवेसारखं दुसरं सुखही नाही. या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात

संसार ही एक जबाबदारी असते त्याचं ओझं वाटायला लागलं की गंमत गेली

बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते म्हणून क्षमा करण्याची ताकद बायकोपेक्षा मैत्रिणीत जास्त असते 

आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही

v pu kale quotes in Marathi

v pu kale quotes in Marathi
v pu kale quotes in Marathi

स्टोव्हची जातच लहरी पुरूषाप्रमाणे. शेगड्या बिचाऱ्या गरीब असतात. एव्हर रेडी! स्टोव्हचं तसं नाही. त्याची मिजास सांभाळली तरच पेटणार 

प्रेम केल्यानेच प्रेम समजतं 

एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल

स्पर्शसुख म्हणजे प्रेम नाही. हा प्रेमाचा  मूळ रंग नाही. तो नुसता अभिलाषेचा तवंग. एक सवंग लालसा. जाता – येता भेटत राहाते – जाणवते. स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते. रस्त्याने जाताना लादली जाते. ऑफिसच्या लिफ्टमध्येसुद्धा ती सुटाबुटात चिकटून जाते. वर पुन्हा सॉरीचं गुलाबपाणी शिंपडायचं आणि त्यावर एक ओशट हास्य. सगळीकडे  ही लालसा थैमान घालताना दिसते. 

भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरं 

एखादा  फुगा फुगवता फुगवता एखाद्या क्षणी फुटतो, तो फुटल्यावर समजतं की किती फुगवायला नको होता

आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार ही आशा सुटत नाही. म्हणूनच आपण जगतो 

डोळे असणाऱ्या माणसाला दुसऱ्याचं सुख बघवत नाही. पाप नजरेचं असतात असं म्हणतात ते उगीच नाही

व. पु. काळे यांचे कोट्स

पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशेब असतो का? गणित असतं का? मैत्री म्हटलं की, खरं तर हिशेब, गणित वगैरे व्यावहारिक शब्द टिकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?

बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की, सगळंच आठवतं

मित्र परिसारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं

जखम करणारा विसरतो, पण ज्याला जखम झाली आहे तो मात्र विसरत नाही

सर्वात जवळची माणसंच जास्त तऱ्हेवाईकपणे वागतात. त्याचं आपण मुळीच मनाला लावून घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करून घेऊ नये याचा घरबसल्या धडा मिळावा हा त्यांचा सद्हेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख निर्माणच होत नाही

लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं, कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रूंदावत जातो 

नवरा बायकोचं नातं म्हटलं की मायेचा ओलावा आला. थोडंसं का असेना पण दोघांना एकत्र गप्पागोष्टी करण्यासाठी एखादा स्वतंत्र कोपरा लागतोच

v pu kale quotes in Marathi

Va. Pu. Kale Quotes On Life In Marathi
Va. Pu. Kale Quotes On Life In Marathi

प्रेम, मैत्री, संगोपन, शुषूश्रा या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाटलं की, त्याची सहजता गेली

माणसाला संसारात काय हवं असतं. मनमिळावू जोडीदार, भागेल एवढी प्राप्ती. पहिला नंबर काढणारी जरी नाही तरी पास होत जाणारी मुलं, छोटसं घर. नव्वद टक्के एवढ्यावर तृप्त असतात

खर्च झाल्याचं दुःख नाही हिशेब लागला नाही की, त्रास होतो

आमच्या संसाररथाला स्वार्थ आणि अहंकार असे दोन उथळलेले अश्व आहेत. कृष्णासारखा सारथी नाही

कोण कुणाला शोभतं आणि शोभेल याचा माणूस फार विचार करतो

relationship v pu kale quotes in marathi

रतीसुखाच्या वेळेला बाईला अंधार सोबती वाटतो. पुरूषांना उजेड हवा असतो. बाईने डोळे मिटून घेतले की ती चिन्मयापर्यंत पोहचते. पुरूष मृण्मयात मातीच्या शरीराशी थांबतो. तो चैतन्यापर्यंत पोहचत नाही

मैत्री म्हटलं की काय असावं आणि काय नसावं याचं चिंतन करावं

v pu kale quotes in Marathi

ज्या माणसाशी आपण मैत्री करतो त्याला अंशतः तरी समृद्ध करण्याची पात्रता आपल्यापाशी आहे का हे पाहावं

देखणी  माणसं सगळ्यांनाच मोहत पाडतात. पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना कधी निर्माण होते? तो प्रेमळ असेल तर. लाघवी, नम्र, मनमिळावू असा वैष्णवजन असेल तर. उन्मत्त सौंदर्यावर कोण लुब्ध होईल?

दुःख आणि डोंगर यांच्यात फार साम्य असतं.
लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात.
एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच.
तसंच दुःखाचं.
जवळ गेलं की या दोन्ही गोष्टी पार करता येणार नाहीत असं वाटतं.
त्याचं रौद्र रूप लांब गेलं की गोजिरवाणं होतं

कोणती फुले टाळायची हे फुलपाखरांनीही समजतं 

पोरगी म्हणजे एक झुळूक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही

एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा.
परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि
परिवारातही असताना पोरकं वाटणं हे एकाकीपण.
एकाकी पटलं तर मनसोक्त रडावं.
अश्रू म्हणजे दुबळेपणा नव्हे.
पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात
आणि दिसेनासे होतात तसाच माणूसही हलका होतो,
आकाशाजवळ पोहचतो.
असंच कोणतंतरी दुःख पार केल्यावर तुकाराम ‘तू का आकाशाएवढा’ असं लिहून गेला असेल

relationship v pu kale quotes in marathi

Vasant Purushottam Kale Thoughts in Marathi
Vasant Purushottam Kale Thoughts in Marathi

मैत्रीचे धागे हे कोळ्याच्या धाग्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत

संसार असाच असतो.
लाकडाचा धूर डोळ्यात जातो
म्हणून चूल पेटवायची थांबायचं नसतं.
दरी निर्माण झाली म्हणजे
आपण खोल जायचं नसतं.
ती दरी पार करायची असते

आपल्यावाचून कुणाचं तरी अडतं ही भावना फारच सौख्यदायक असते

ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही

मोहरून जाणं ही अवस्था मैत्रीत महत्त्वाची. ही अवस्था टिकवायची असते

तुझं व्यक्तीमत्व निर्भिड असावं. रोखठोक पण सरळ, बाणेदार तरीही नम्र आणि त्याहीपेक्षा पारदर्शक. अर्थात विलक्षण धैर्य असल्याशिवाय हे रूपांतरण संभवत नाही

आम्हाला आशा आहे की v pu kale quotes in Marathi, Va. Pu. Kale Quotes On Life In Marathi, व. पु. काळे यांचे कोट्स मराठीमध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग Vasant Purushottam Kale Thoughts in Marathi share करायला विसरु नका.

Leave a Comment