20+ Prem status Marathi | Prem quotes in Marathi | मराठी शायरी प्रेमाची { Love }

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Prem quotes in Marathi, Prem status Marathi, शायरी प्रेमाची आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Marathi prem Shayari कलेक्शन आवडल असेल, जर प्रेम मराठी स्टेटस आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Prem quotes in Marathi | प्रेम मराठी कोट्स

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

marathi prem shayari
marathi prem shayari

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

Prem status Marathi | प्रेम मराठी स्टेटस

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

Marathi prem Shayari | मराठी शायरी प्रेमाची

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती.

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

prem status marathi
prem status marathi

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा.

प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

आम्हाला आशा आहे की Prem quotes in Marathi, Prem status Marathi, शायरी प्रेमाची आणि कोट्स मराठीमध्ये तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग Marathi prem Shayari share करायला विसरु नका.

Leave a Comment