Modern Marathi Ukhane For female | नव्या पिढीचे मराठी उखाणे

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Modern Marathi Ukhane For female, नव्या पिढीचे मराठी उखाणे,  Latest Marathi ukhane, Gruhpravesh ukhane, Ukhane For Pooja संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Modern Marathi Ukhane For female कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग http://maharashtrian.in ला आवशय भेट दया

Modern Marathi ukhane for female | नव्या पिढीचे मराठी उखाणे

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी…
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

‘नांदा सौख्यभरे’ दिला सर्वांनी आशीर्वाद…
__चे नाव घेते, द्या ____चा प्रसाद!

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी…
__ रावांचे नाव घेते, __च्या वेळी

ज्योत दिव्याची मंद, तेवते देवापाशी…
___ चे नाव घेते, ___ च्या दिवशी.

स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी…
__रावांचे नाव घेते, __च्या वेळी

lagnache ukhane
lagnache ukhane

जीवनाच्या करंजीत, प्रेमाचे सारण…
नाव घेते ___रावांचे, सांगून (पूजेचं नाव) चे कारण.

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी…
___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी.

मोगऱ्याचा सुगंध, स्पर्धा करतो निशिगंधाशी…
___ चे नाव घेते, ___च्या दिवशी

(देवाचे नाव) आशीर्वाद दे, येऊ दे भाग्या भरती…
___रावांच्या उत्कर्षाची, कमान राहू दे चढती!

फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी…
___ रावांचे नाव घेते, ___ च्या वेळी.

lagnachi ukhane
lagnachi ukhane

कृष्णाच्या गायींना चरायला, हिरवे-हिरवे कुरण…
___रावांचे नाव घ्यायला, ____चे कारण

गोपिकांना करते धुंद, कृष्णाची बासरी…
___ रावांचे नाव घेते, ___ आहे सासरी

पांढऱ्या शुभ्र भातावर, पिवळं धमक वरण…
___रावांच नाव घेते, ____चे कारण

नऊवारी साडीवर, शोभून दिसते ठुशी…
____रावांचे नाव घेते, ____च्या दिवशी

सरस्वतीच्या मंदिरात, साहित्याच्या राशी…
___रावांचे नाव घेते, ___ च्या दिवशी

Latest Marathi ukhane | पूजेला मराठी उखाणे | Ukhane For Pooja

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी…
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी 

__च्या दिवशी दरवळे, वाळ्याचे अत्तर…
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमीच तत्पर 

मोत्यांची माळ, सोन्याचा साज…
__ रावांचे नाव घेते, __ आहे आज 

__ची आरास, सर्वांना पडली पसंत…
__रावांमुळे फुलला, जीवनी वसंत

lagnatil ukhane
lagnatil ukhane

आला आला __चा, सण हा मोठा…
__राव असताना, नाही आनंदाला तोटा 

__पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी…
__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी  

उगवला सूर्य, मावळला शशी …
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

__समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी …
__ रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

__च्या दिवशी, दारावर बांधले तोरण…
__रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?

__पुढे मांडले, प्रसादाचे ताट…
__मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट 

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी…
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

marathi ukhane for bride
marathi ukhane for bride

__ची पूजा, मनोभावे करते…
__रावांसाठी, दीर्घायुष्य मागते  

__च्या पुढे, फुलांचे सडे…
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!

भरजरी साडी, जरतारी खण…
__रावांचे नाव घेते, आहे__चा सण

__पुढे लावली, समईची जोडी… 
__ मुळे आली, आयुष्याला गोडी  

__च्या उत्सवाला, आली खूपच धमाल…
__रावांच्या कल्पकतेची, आहे सगळी कमाल

__च्या समोर, ठेवले केशरी पेढे…
__रावांचे  नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे?

Gruhpravesh ukhane |
गृहप्रवेश करतानाचे मराठी उखाणे

सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश…
__ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश

सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात…
__रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट

नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड…
____च नाव घेतो, आता तरी वाट सोड

माहेरी साठवले, मायेचे मोती…
__च नाव घेऊन, जोडते नवी नाती

navin ukhane
navin ukhane

आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary… 
__ रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry

शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात… 
__रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात

उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल…
__च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल

नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…
__रावांचे नाव घेते, __च्या दारात

रुपेरी सागरावर, चंदेरी लाट…
___ रावांचं नाव घेते, सोडा माझी वाट. 

__ची लेक झाली, __ ची सून…
__ च नाव घेते, गृहप्रवेश करून!

गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट…
____रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट

मायेने वाढवले, संस्कारांनी घडवले…
__चं नाव घ्यायला, __नी अडवले

रस्ता अडवायला, जमल्या सगळ्या बहिणी…
____ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी?

जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज… 
__च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज

navriche ukhane marathi
navriche ukhane marathi

लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल…
__ रावांचे नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल

हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट…
__रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट

नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले…
__रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले

खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप…
__रावांच नाव घेऊन, ओलांडते मी माप\

जमले आहेत सगळे, __च्या दारात…
__रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात

Lagnachi ukhane

संसाराच्या रथाचे, प्रेम आणि विश्वास सारथी…
____रावांसोबत करते, मी ____ची आरती

____ला नेसली, साडी नऊवारी…
____ व माझी जोडी, आहे सगळ्यांत भारी 

हातात हिरवा चुडा, गळ्यात शोभते ठुशी…
____रावांचे नाव घेते, ____च्या दिवशी

फुलापानांची रांगोळी, काढली आज दारी…
____रावांसोबत करते मी, ____पूजेची तयारी

संसाराच्या करंजीत, प्रेमाचे सारण…
____रावांचे नाव घेते, ____दिवसाचे देऊन कारण

smart marathi ukhane for bride
smart marathi ukhane for bride

ताटांपुढे काढते, रांगोळी क्रमाक्रमाने…
___रावांचे नाव घेते, तुमच्या इच्छेप्रमाणे

निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी…
___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी 

वसंतात दरवळतो, फुलांचा सुवास
___सोबत सुरु केला, मी जीवनाचा प्रवास

माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून… 
जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून

राहतो आम्ही प्रेमाने, पूनव असो वा अवस…
___रावांचे नाव घेते, बघून ___चा दिवस

नव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून… 
__चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून

New ukhane in Marathi

सुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात… 
__ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात 

माहेरच्या आठवणीने, डोळे झाले ओले…
__रावांच्या प्रेमाने, अश्रूंची झाली फुले

हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…
__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे 

माहेरची नाती, जणू रेशमाच्या गाठी…
रेशीमबंध सोडून सासरी आले, ___च्या साठी

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस…
__तू फक्त, मस्त गोड हास  

प्रेमरूपी दिव्यात लावते, प्रीतिची वात…
___रावांचे नाव घ्यायला, केली आजपासून सुरुवात

नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना, मन माझे भांबावते…
___च्या साथीने नव जीवनाचे, स्वप्न मी रंगवते

परातीत परात, चांदीची परात…
(माहेरचे आडनाव) ची लेक आणली, मी (सासरचे आडनाव) च्या घरात.

पायातल्या जोडव्यात, माहेरची स्मृती…
___ रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती

गुलाबाचे फूल, मोहक आणि ताजे…
__च्या येण्याने, भाग्य उजळले माझे

बहिणीसारख्या नणंदा, भावासारखे दीर…
___रावांचे नाव घ्यायला, झाले मन अधीर

ukhane for bride
ukhane for bride

नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून…
__रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून…

नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा…
__राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा 

संसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान…
__रावांच नाव घेते सर्वांचा राखून मान

माहेर सोडताना, पावलं झाली कष्टी…
__रावांच्या संसारात, करेन सुखाची वृष्टी 

नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी…
__माझा राजा आणि मी त्याची राणी

बरसला पाऊस, दरवळली माती…
__रावांसोबत, फुलली नवीन नाती

लाल लाल मेहेंदी, हिरवागार चुडा…
__ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा

चांदीची जोडवी, लग्नाची खूण…
__ रावांचे नाव घेते, __ची सून 

नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती…
संसार होईल मस्त, __राव असता सोबती

आपला आशीर्वाद,आहे लाख मोलाचा… 
__रावांसोबत, संसार करेन सुखाचा

सासरचे निरांजन, माहेरची फुलवात…
__रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात

नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा…
__रावांसोबत, संसार करीन सुखाचा

आता Modern Marathi Ukhane For female कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील Latest Marathi ukhane इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात.

तुमच्या जवळ आणखी Ukhane For Pooja, Latest Marathi ukhane असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद् ‍‍

आम्हाला आशा आहे की Modern Marathi Ukhane For female, Gruhpravesh ukhane तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग family, मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment