Marathi ukhane for bride for special occassions like marriage, dohale jevan, haldi kunku and more. This is a collection of Marathi Ukhane scripted so creatively that you are sure to impress the social gathering whereever you recite them. They are a perfect way to convey, how much your spouse mean to you through a poetic four line rhyme. Not just that, if you know anyone in your circle who needs to say these marathi ukhane for groom, you can share them instantly.
Table of Contents
What is Marathi ukhane for bride ?
आता जरी wife आपल्या नवऱ्याला सर्रास त्याच्या नावाने हाक मारत असल्या तरी पूर्वीच्या काळी मात्र अशी पद्धत नव्हती. मग नवऱ्याचं नाव कसं घ्यायचं. त्यातूनच उखाण्यातून नाव घेण्याची सुरूवात झाली असावी. Ukhane म्हणजे लहान लहान आणि यमक जुळवून केलेल्या वाक्यरचनेतून आपल्या navrayche नाव घेणे. खासकरून Maharashtrain लग्नात Navra आणि Navri उखाण्याचा आग्रह केला जातो. आजकाल उखाण्यात बरीच विविधता दिसून येते. टिपीकल उखाण्यासोबतच funnyउखाणेही खूपच popularआहेत.
They are original, creative and a perfect combination of funny marathi ukhane navardevasathi and touching Marathi Ukhane SMS. So celebrate culture through these Marathi Ukhane in 160 characters and make you loved ones smile. Every person from Maharashtra will fondly relate to the feelings in these Marathi navardevache ukhane. You can also post these Marathi Ukhane SMS greetings and wishes on Facebook and Twitter to add that special touch to the celebration. So get set go, pick Marathi Ukhane for pooja, Funny Ukhane for wedding, Emotional best marathi ukhane for bride and much more.
Best marathi ukhane for bride
संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा…
__ रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा
मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची मी सून
Marathi Ukhane for Bride
उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल
आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश
दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची
__च नाव घेते, सून मी __ची
नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
…. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी
सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप
आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम…
__सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम
गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती
Best Marathi Ukhane for Bride
सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,
…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात
हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी
मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध…
__शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध
माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
आणि …. रावांच्या घशात अडकला घास
आतून मऊ पण बाहेर काटेरी साल…
__दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल
बारिक मणी घरभर पसरले,
….. रावांसाठी माहेर विसरले
funny marathi ukhane for bride
एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती
चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा
Funny marathi ukhane for bride
संसाराच्या सागरात प्रेमाची होडी…
__रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी
गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले
सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा
आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा…
__ रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा
मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,
….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला
modern marathi ukhane for bride
पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
….. रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला
सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले
हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी…
__ रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी
मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
….. रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
…..रावांचे नाव घेते …..च्या दिवशी
सासरची छाया, माहेरची माया…
__आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया
सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी
latest marathi ukhane for bride
रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात
पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी…
__मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी
सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
—— रावांचे नाव घेते —— ची सून
एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
—— रावांची सारी माणसे मी आपली मानली
हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
—— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत
Ukhane for bride
काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार…
__ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार
काढ्यात काढा पाटणकर काढा,
—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा
marathi ukhane for bride in english
अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना
सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध…
___ सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !
देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
—– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश
अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले ——- रावांची सौभाग्यवती
दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी…
__ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
—— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात
झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
—– राव सुखी रावो हीच आस मनाची
marathi ukhane for bride latest
शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
—— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता
जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
—— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद
सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
—— रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही …
__ रावांचे नाव हळूच ओठी येई
प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
—— रावांचे नाव घेऊन सोडले काकण
इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
—— रावांचे नाव घेते—— ची मी सुन
मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
—— रावांनी दिला सौभाग्याचा आहेर
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
——रावांना भरविते जिलेबिचा घास
चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा …
___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा
सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
——रावांचे नाव घेते ऐका सारेजण
long marathi ukhane for bride
आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
—— रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल
मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
——रावांचा संसार हा सुखाचा कळस
लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
——रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात
Ukhane in marathi for brides
चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा …
___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा
मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,
——राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी
वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,
….. रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा
ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,
….. राव आणि माझी जोडी ठेव सुखात
मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून,
—- राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून
मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
शंकरासारखा पिता, अन गिरिजॆसारखी माता,
….. रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता
विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,
….. रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष
old marathi ukhane for bride
जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,
….. रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा
शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले,
….. रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले
शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,
आता ….राव माझे जीवनसाथी
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी
सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,
….. रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,
….. रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब
संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
….. रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती
प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात,
…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात
भोळ्या शंकराला बेलाची आवड,
….. रावांची पती म्हणून केली मी निवड
एक तीळ सातजण खाई,
…. रावांना जन्म देणारी धन्य ती आई
marathi ukhane for bride for pooja
रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
…. रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास
रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा,
….. रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा
सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले
शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
….. रावांच्या प्राप्तीने माझे, भाग्य उदयाला आले
दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी,
….. रावांचे नाव घेऊन, बांधते मुंडावळी
दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी,
….. रावांचे नाव घेते, खास तुमच्या आग्रहासाठी
फुलले गुलाब गाली, स्पर्शात धुंद झाली प्रीती,
….. रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती
Modern marathi ukhane for bride
करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला, शक्ति पेक्षा युक्ति ने,
…. रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे
marathi ukhane for bride in pdf format
मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ,
….. रावां मुळेच आला माझ्या जीवनाला अर्थ
लग्नासारख्या मंगलदिनी नका कोणी रुसू,
….. रावां ना घास देताना येते मला गोड हसू
चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती,
…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती
संकेताच्या मिलनाकरीता नयन माझे आतुरले,
….. रावां ची मी आज सौभाग्यवती झाले
अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा,
…..रावांच्या नावाने भरते लग्नाचा हिरवा चुडा
तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद,
माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात,
….. रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
….. रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून
प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची
काचेच्या बशीत बदामचा हलवा,
….. रावांचे नाव घेते, सासुबाईंना बोलवा
नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
….. च्या घराण्यात ….. रावांची झाले महाराणी
अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण,
वरणावर तुप, तुपासारखे रुप, रुपासारखा जोडा,
….. रावांचे नाव घेते वाट माझी सोडा
smart marathi ukhane for bride
हरीश्रंद्र राजा, रोहिदास पुत्र,
….. रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र
…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा
काव्य आणि कविता, सागर आणि सरिता,
….. रावांचे नाव घेते, खास तुमच्या करिता
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,
….. रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा सौभाग्याचा
सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान,
….. रावांची राणी झाले, आहे मी भाग्यवान
साँजवात लावताना येते माहेरची आठवण,
….. रावांसाठी झाली माझी सासरी पाठवण
स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी,
…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सूत्राची जोडी
साता जन्माच्या जुळल्या गाठी,
….. रावांचे नाव घेते चालताना सप्तपदि
जाईजुईचा वेल पसरला दाट,
…..रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ
मंद मंद वाहे वारा, संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो …..रावां आणि …..ची जोडी
काचेच्या बशीत आंबे ठेवले कापुन,
….. रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन
Ukhane for bride in marathi
श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य,
….. राव आणि माझ्या संसारात होईल, तुम्हा सगळयांचे नेहमी आदरातिथ्य
उखाणा घे उखाणा घे, करू नका गलबला,
पूर्वपुण्याईने ….. रावां सारखे पती लाभले मला
निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे,
….. रावांच्या संगतीने उजलेल् माझे जीवन सारे
चंद्राला रोहिणी भेटे आकाशी,
…..रावां चे नाव घेते लग्नाच्या दिवशी
नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे
जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते,
सगळ्यांचा मान राखून नाव ….. रावांचे घेते
सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
….. रावांचे नाव घेण्यास सगळ्यांनी अडविले
सरिते वर उठतात तरंग, सागरावर उठतात लाटा,
….. रावांच्या सुख-दुखात अर्धा माझा वाटा
शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात,
….. रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात
लग्नमंडपात निनादतात सनईचे सूर,
…..रावां च्या साठी आई वडिलांचे घर केले दूर
चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा
संसाराच्या देवार्यात नंदादीप तेवतो समाधानाचा,
…… चे नाव घेऊन मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.
लक्ष्मी शोभते दाग-दागिन्याने, विद्या शोभते विनयाने,
…… च नाव घेते तुमच्या आग्रहाने.
चांदीच्या तबकात खडीसाखरेचे खडे,
…… च नाव घेते…… पुढे.
आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे,
……. च नाव घेते तुमच्या आग्रहाने.
डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटल
मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर-माहेरचा,
…… नाव घेऊन मान राखते सर्वांचा.
नीलवर्णी आकाशात चमकतात चांदण्या,
…… च नाव घेते…… ची कन्या.
संसाराच्या देवार्यात नंदादीप तेजावा समाधानाचा,
…… पाठीशी आशीर्वाद असावा तुमचा.
रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित,
…… ना दीर्घायुष्य मागते नातेवाईका सहित.
गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे
अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र,
…… हाती माझे जीवन सूत्र.
शशी रजनी, रवी उषेची नियतीने बांधली जोडी,
…… च्या संसारात आहे प्रेमाची गोडी.
संसाराच्या अंगणात सुख दुःखाचा खेळ अविनाशी,
…… चा उत्कर्ष होवो हेच मागणे देवा पाशी.
गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व,
…… पती मिळाले यात आले सर्व.
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार
दया, क्षमा, शांती तेथे लक्ष्मीचा वास,
…… च नाव घेते तुमच्यासाठी खास.
सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला,
……. सुखी राहत हा आशीर्वाद द्यावा मला.
कमल फुलांचा हार महालक्ष्मीच्या गळ्यात,
……. च नाव घेते सुवासिनी च्या मेळ्यात.
परिजात अंगणात, रांगोळी दारात,
…… च नाव घेते…… च्या घरात.
Marathi ukhane navardevasathi
लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती,
…… पति मिळाले म्हणून भाग्य मानू किती.
नागपंचमी च्या सणाला, सख्या पुजती वारुळाला,
…… विना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला.
थोर कुळात जन्मले, संस्कारात वाढले,
…… च्या जीवावर भाग्यशाली झाले.
विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी,
…… च नाव घेते खास…… साठी.
हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत
आई-वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस,
…… पती मिळावे म्हणून खूप केले नवस.
प्रेमाचा दिला हुंडा मानाची केली करणी, जीवनाचे
पुष्प वाहिले,…… च्या चरणी.
नाव घ्या, नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा,
……. च नाव असते ओठी पण प्रश्न पडतो उखाण्याचा.
नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा,
…… च्या संसारी असाव्या सर्वांच्या शुभेच्छा.
श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन
हळद लावते किंचित, कुंकू लावते ठस ठासित,
…… पती मिळाले हेच माझे पूर्वसंचित.
बाल्य गेलं माता-पित्याच्या पंखाखाली,
तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रीची साथ,
संसाराच्या वळणावर मिळाला,
…… चा प्रेमळ हात.
नैवेद्य नेला नामदेवाने, विठ्ठलाने खाल्ला घास,
…… च नाव घेते…… साठी खास/तुमच्यासाठी खास.
हिरकणी बुरुज अमर झाला मातेच्या वात्सल्याने,
…… नाव घेते आग्रह पेक्षा प्रेमाने.
दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
…चे नाव घेते तुमच्या साठी!
स्वाती नक्षत्रातील थेंबांचे शिंपल्यात होती मोती,
……. मिळाले पत्ती म्हणून ईश्वराशी आभार मानू किती.
देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,
……. नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.
आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास,
……..नाव घेते तुमच्यासाठी खास
सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान
उभी होते तळ्यात, नगर गेली मळ्यात,…….हजाराची कंठी,
…………. रावांच्या गळ्यात.
नागपूरची संत्री, जळगावची केळी,
………… रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.
मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण,
…….. साठी मागितले दीर्घायुष्याचे दान,
मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते,
…………चे पत्नी पद अभिमानाचे मिरवते.
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे ..रावांची राणी
कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मीच्या गळ्यात,
………चं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात.
नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय,
……….च्या सहवासात जीवन झाले सुखमय.
रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला,
………..चं नाव घेते ……..सणाला
सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,
……….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.
शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,
……….. सारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता.
Navardevache ukhane
निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान,
…………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी,
……….चं नाव घेते ………. दिवशी.
आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,
………… चा व माझा संसार आहे सुखाचा.
भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता,
………… नाव घेते सर्वांच्याकरिता.
गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी,
……..रावांच नाव घेते ……..दिवशी,
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे
संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,
………च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.
सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं,
जीवन नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.
दह्याचे करतात श्रीखंड, दूधाचा खवा,
……..चं नाव घेते नीट लक्षात ठेवा.
सतारीचा नाद, वीणा झंकार,
……….. च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार.
प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनाची, त्याग
जाणावा राम सीतेचा,…….नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार
दारातील तुळशीला पाणी घालते गार,
…….रावांच्या नावाला आग्रह नको फार.
दारातील तुळशीला पाणी घालते गार,
…….. रावांच्या नावाला रात्र झाली फार.
आई-वडिल, भाऊ-बहीण यांच्या सहवासात वाढले,
……….मुले मला सौभाग्य चढले.
तिरंगी झेंड्याला वंदन करतात वाकून,
……..रावांचं नाव घेते तुमचा मान राखून,
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा
ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल
पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते
Navriche ukhane
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला
माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,
… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती
पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा
Marathi navriche ukhane
कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी
लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती
मंदिरात वाहते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान
Ukhane in marathi for wife
राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला
कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,
…राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद
1001 Best Marathi Ukhane List: नवीन उखाणे
असेच नवनवीन उखाणे ऐकत राहण्यासाठी आजच Like, Share आणि Follow करा.
आणि हो, तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटत आहेत हे खालील Comments मध्ये जरूर कळवा