Best 40 मराठी चारोळ्या Marathi Charolya on life | Marathi prem Kavita Charolya

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Marathi Charolya, Marathi Charoli, Marathi Charolya on life, Marathi prem Kavita Charolya, मराठी चारोळ्या आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

This is latest New collection of Motivational charoli in marathi, जीवनावर मराठी चारोळ्या, chandrashekhar gokhale charoli. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे marathi charolya for husband कलेक्शन आवडल असेल, जर Marathi Charolya आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Marathi Charolya | मराठी चारोळ्या

सये रोज नव्याने दरवळतो
तुझ्या आठवणीचा सुगंध
मग उगाचच जडतो जीवाला
तुला आठवायचा वेडा छंद

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते

श्रवण म्हणजे मला वाटतं
प्राजक्ताचे दिवस
सृष्टीने कधीतरी करून
फेडलेला नवस

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो,
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो.

रडवु नको मलाहे जीवना आताशांत करायलाआता कुणीच नाहीये

शेवटचं आज जाताना ,
मागे वळून पाहणं नव्हतं…
तेव्हाच कळलं मला ,
सारंच आता संपलं होतं

शांत संध्याकाळी समुद्रकिनारी
तुझी वाट बघत मी बसलो होतो
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी
एकटाच बोलत बसलो होतो

माझं असं वागणं
तुला खरंच झेपेल का.?
ढगाआड चंद्र लाजून
लपला चालेल का?
जवळच असूनही तुझ्यापासून
दूर राहीले तर खपेल का. ?
इतकं प्रेम करूनही
व्यक्त झाले नाही तर
मनाला तूझ्या रूचेल का..?
आठवणींनी कंठ दाटून आला तर
माझं मन कुठे रमेल का..?
प्राजू 

Marathi Charoli
Marathi Charoli

गरुडासारखे उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते.

सरलेल्या आयुष्यात ही
थोड्या आठवणी आहेत,
सुखाचे क्षण जरी विसरले
त्या आठवणी सोबतीला आहेत

शांत असा मी कधीच नव्हतो..
प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!!
असता जवळी तू, कधी हताश नव्हतो..
नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..?

सरलंय आयुष्य माझ
तुझी वाट तशीच आहे,
गेलीस तू जीवनातून दूर
तुझी आस अशीच आहे

गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेलं आयुष्य भरभरुन जगा

सर्वांपासून दूर एक
वेगळीच दुनिया आहे…
जिथे फ़क्त
तू आणि मी आहे

सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवि किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू 

Marathi Charoli | चारोळ्या मराठी

सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुम्फलेल्या,
पारम्ब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या

सागराला वाटलं
थोडसं व्हाव शांत
का नदीने हि त्या
पाहावा एवढा अंत ?

सये मन माझं भरकटतं असे,
रंगबेरंगी फुलपाखरासारखं…
अन् शोधत प्रत्येक फुलात,
प्रितीचा गंध तुझ्यासारखं

सुखाची चटक लागली कि
मनाला दु:ख सोसवेनास होत.
आपल्या आभाळभर आकांक्षानी
आपलच दैव आपल्यावर उलटत

पंखहीन असतील जरी अश्रू
तरी प्रवास अबोल भावनांतून होतो,
ह्या डोळ्यातला मोती क्षणात
समोरच्या डोळ्यातुन ओघळतो

कोल्ह्यांची जमली टोळी
सिहांची शिकार करणार
सगळे भ्रष्टाचारी आत्ता
देश भ्रष्टाचार मुक्त करणार

माया ममता गोड झाल्या
एक झाला लालू बालू
शरदाच्या चांदण्यात आपण
चला जय बांगला बोलु

विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असत. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसत.

सोडून तू गेलीस असं ,
काय माझं चुकलं होतं …
तुला हवं ते सारंच ,
आजवर तर मी दिलं होतं

संपेल कधी हा दुरावा
होईन कधी एकरूप
एकदाच मज घेऊन कवेत
जाळून टाक तव तेजात

Marathi Charolya on life
Marathi Charolya on life

जीभेला सांभाळायला शिका, तिचा तोल गेला की माणसं गमवण्याची वेळ येऊ शकते.

सांग कसा गं राहू, तुझ्या
प्रेमापासून दूर असा..
वाट पाहणाऱ्या हृदयाला,
मी समजावणार कसा.

सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना

संगीत जुनचं आहे
सूर नव्याने जुळतायत…
मनही काहिसं जुनचं
तेही नवी तार छेडतायत…

अकड तो मेरे फितरत में नही है झुकना तो मेरे लिए मुश्किल नहीं हैं फिर भी अड़े रहते है कुछ उसूल तसव्वुफ पर बड़ी अजीब सी हैं गुरुर को मरोड़ के खाने में

सांग या ह्रदयाचं
आता मी काय करू…
ठेवू स्वतःकडे की,
तुला देऊन जावू…

सखे तू अशी नेहमी
वेड लावून का जातेस
डोळे मिटले कि तू
स्वप्नात येऊन जातेस

इच्छांचा पिच्छा सोडिला आयुष्य तेव्हा कळले. दिवसाचे हास्य पसरले जेव्हा डोळ्याचे ओझे रात्री तुनि ढळले

सख्या रे काय सांगु तुला
जीव माझाच मजवरी उधार झाला
या वेड्या सखीने तर तो ही
मजपासुनी दुर नेला

Marathi Charolya on life | जीवनावर मराठी चारोळ्या

श्वासात फक्त मी नाही माझा
प्राण तुझ्यात जडला आहे,
शरीरं असल माझ, मनाने
तुझ्या रुपात हरवलो आहे

हल्ली मला भावनांचा
थांगच लागत नाही ,
क्षणभरही मनाला आता
उसंत मिळत नाही 

हेंड समशक्ल के पीछे बहोतसे हादसेछिपे होते है

सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सगळीच वादळं मी
खिडकीत बसुन सोसली
अन् हि बाट्ली सुध्धा
खिडकीत बसुनच ढोसली

सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल
केव्हा उमलल कळलच नाही,
तु माझी, तु माझी म्हणताना,
मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही

मंद उजेडास पाहुनी आभाळभर पाजळतो तिळाला पाहुनी हल्ली काळोख जळतो स्वतःच्या त्रिज्या लक्षात आल्या त्याला नाचता आलं नाही की अंगण सोडून पळतो

Marathi Charolya
Marathi CharolyaMarathi Charolya

सांग कसा गं राहू, तुझ्या
प्रेमापासून दूर असा..
वाट पाहणाऱ्या हृदयाला,
मी समजावणार कसा

सगळचं बरोबर करताना
काही चुका करुन गेलो,
त्यात न विसरणाऱ्या व्यक्तीलाही
मी आज विसरुन गेलो

मन हलक असावंपण हलकट नको सर्यातूनी निसटता यावंपण तेलकट नकोमन माती सारखं असावंपण मातकट नकोमन खट्याळ असावंपण वात्रट नको.

हसतेस इतकी सुंदर की,
तुझ्याकडे बघत बसतो…
आठवणीत मग तुझे ते
गोड हसणेच पाहत असतो…

सत्ता हाती हवी म्हणून
तळवे चाटतात परकीयांचे
खोटी आश्वासाने देऊन देऊन
पैसे खातात स्वकियांचे

हसत राहतो नेहमीच
मनातले दुःख लपवण्यासाठी…
सुखच मिळत नाही
तेवढं खरंखुर हसवण्यासाठी…

इतके मी व्हावे आश्वस्त या मार्गस्थ जीवनी संयम असा यावा अंगी जसा संधीच्या शोधात बोका ध्यानस्थ

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे…
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे

हळूच माझ्या ह्रदयाला कोणीतरी
चोरून नेलंय….
स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे
ठेवून गेलंय

सगळ्यात अनोळखी कोण आहे ?
तर मी आहे माझ्यासाठी
अन सगळ्यात जवळचा कोण आहे
तर मी आहे तुझ्यासाठी

हस-या या चेह-यामागे,
खूपसं दुःख दडलेले…
काहींना ते हसणेही,
कधी ना पहावलेले

हळूच दबक्या पावलांनी ,
तुझ्याकडे मी यायचं…
आणि तूला ते दरवेळी ,
आधीच कसं गं कळायचं ?

Marathi prem Kavita Charolya | मराठी प्रेम कविता चारोळ्या

सनी गणेश अमोल सागर
मित्र माझे केवढे
एक जण पक्त ज्युस पितो
बाकी पक्के बेवडे.

लोक जवळ आले की
साळसूदपणे #परकी वागतात,
खोट्या #जखमा खोटीच फुंकर
बेमालूमपणे खोटं जगतात

हजार वेळा तुला पहावे
असेच काही तुझ्यात आहे
मिटुन ङोळे पुन्हा बघावे
असेच काही तुझ्यात आहे

स्मृतींचे पारिजात बहरलं
जसं रोमरोमी डवरल
स्मृती गंधात न्हाऊन
मनाच्या अंगणी बरसलं

साऱ्या जगाने अश्रू ढाळले होते आमच्या जवळी आम्ही ढाळताना कोणी नव्हते आमच्या जवळी दुःखहे आमचे माणूस घाणे नसे आवडे गर्दी त्यास पाहुनी एकांत बिलगण्यास येते आमच्या जवळी

सहसा दाखवत नाही, मी कोणाला
माझा दुःखात बूडालेला चेहरा
लोकं मात्र विचारत राहतात,
तू नेहमीच कसा रे हसरा?

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला

शिकार करायला लागल्यावर
तू गळ घेऊन आलास…
पाण्यात खूप मासे होते
पण तू जलपरी मागे धावलास

हताश नाही व्हायचं
प्रेमात धोका मिळाला तर,
जगायचं त्यांच्यासाठी ज्यांनी
जीव लावलायं आपल्यावर

स्वतःचं मन मारून
तुला बरं जगता आलं
आपल्यांशी देखील तुला
परक्यासारखं वागता आलं

हरणे तर नसते कुणातही
असतो तो खेळ नियतिचा,
कधी सुखातं हसू तर कधी
दु:खातं मनाला रडवण्याचा.

फस्त केली दुःखे सारी मी ताटातली नशीब पुन्हा पुन्हा का बाढून जातेमी मांडली कुंडली डोळसपणे आयुष्य अंधपणेफाडून जाते

सारखचं वाटतं पाऊस पडावा,
तू सोबत असताना…
ओढणी धरावीस डोक्यावर
पावसाचा थेंब पडताना

स्वप्न मलाही पडतात, पण
त्यांच्या मागे मी धावत नाही
माझ्या आठ बाय दहाच्या खोलित
राजवाड्याचा दरवाजा मावत नाही

सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना

स्वप्नांच्या मागे धावु नकोस,
स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहीत…
उरतात ते फक्त उसासे,
अश्रु पण खाली ओघळत नाहीत

Marathi prem Kavita Charolya
Marathi prem Kavita Charolya

हलकेच येऊन कानात ,
तुला सांगायचंय काही…
मिठीत तुझ्या येऊन ,
थोडं रहायचंय राणी…

Motivational charoli in marathi | मराठी मध्ये प्रेरणा चारोली

श्रावणसरीही मित्रा आता
परक्यासारख्या वागतात
ऊनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून धावतात

हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला

सोबत नसतेस तरी ,
तुझा स्पर्श जाणवतो…
का? आजही हा जीव,
तुझ्यासाठी तळमळतो

हे प्रेमाचं असचं असत..
थोडसं अवघड अन थोडं सोप असत
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं.

हातात धरलेलं पाखरु अवचित सुटावं
तसा जीव सुटतो देहातून
कोणी त्या क्षणांची वाट बघतं..
कोणी धास्ताऊन जात मनातून

सांग सख्या , मी गेल्यावर
तुज माझी आठवण येईल का?
जाता जाता माझ्यासाठी तु,
दोन अश्रु गाळशील का?

होकारांला शब्दांना महत्व नसते
दाटल्या भावानांना काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची गरज नसते

होती लाही लाही झालेली तिची काया
आता रूप अन रंग हि उजळलेला
अशी पांघरली धरतीने हिरवाई
जणू हिरवा शालू नववधुने ल्यालेला

हा पहाटेचा पाऊस अन
माझे डोळे मिटलेले
तुझे माझे क्षण ओवताना मनात
काही क्षण सुटलेले

ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्याशिवाय
काहीच मागत नाही
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही

सोबतीला असे आज ही सांज ओली
अवेळी आठवांचे धुके दाटलेली…
ऋतू जीवघेणे किती विसरावे..
पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली

आकाशातले द्योंगावणारे विमान आणि त्यामागुन विरत चाललेल्या धुरामध्ये हरवलेलं बालपण आठवत राहतं उंचावूनी हात मारलेली हाक हरवलेल्या ढगात हरवलेल्या झाडांत काटलेला माग डोळ्यांत साठवत राहतं मोठे होत गेलो कक्षा रुंदावत गेल्या क्षितीजे धुंडाळले स्वप्ने गुंडाळले तरी बालपणीच विमान गाठत राहतं

Motivational charoli in marathi
Motivational charoli in marathi

हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी

साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना,
तु नसण्याचं शल्य कसं दाखवु

हातात पेन घेतले आणि तुझ्यावर
काही लिहूयात म्हंटले….
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले

स्पर्श तो तुझा
हवा हवासा
श्वासातून भासे
नवा नवासा

हिवाळ्यातील ही गुलाबी हवा
सोबत तू ही असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी

सांग हळूच कानात ,
येऊन सारे
तुझ्याही मनात ,
काहीतरी आहे

हाताच्या ओंजळीतं खूप सारी
स्वप्ने रेखाटलेली आहेतं,
ती तुझ्या आणि माझ्यासाठी
नव्याने साकारलेली आहेत

स्पर्श तुझा व्हावा,
अन देह हा माझा लाजून चूर व्हावा
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा

हसत असतो, पण मनात कुठेतरी
दुःख नेहमीच असतं…
हसता हसता, अचानक
डोळ्यात पाणी दाटतं

समुद्राच्या किनार्‍यावर दिसते
ती गोड लाट पाण्याची,
संदेश घेऊनी येत असावी का?
ती लाट, माझ्या प्रेमाची

ही भेटच नाही तर फक्त
एक माझी आठवण आहे
हे फक्त शब्दच नव्हे, यात
विचारांची साठवण आहे

सांगितले वारंवार तुला
तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही
प्रेमात सर्वात मोठा असतो तो विश्वास
तो माझ्यावर तु ठेवलास नाही

हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाची तरी
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोणाच्यातरी मनाची रानी

माणसाने फक्त इतकं शहाणं असावंत्याला मूर्ख म्हणल की शिवी वाटावी

हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात
तुझीच आठवण ताजी आहे…
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे

सांज वेळ येते रोजचं
रोजचं अशी ही वेगळी भासते…
सुर्य जातो पल्याड रोजचं
रोजचं मन ही उनाड भासते

हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल…
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल

समईला साथ असते ज्योतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची

सागरची प्रत्येक लाट
माझ्या ओळखीची होती
कारण ती त्याच्या येवढीच
माझीही होती

ही कवितांची वही उघडा
पण जराशी जपून
नाहीतर चाहूल तुमची लागताच
शब्द बसतील लपून

आता Marathi Charolya for whatsapp and facebook सर्व नवीन Marathi Charoli, Marathi Charolya on life, Marathi prem Kavita Charolya, इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता मराठी चारोळ्या सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

तुमच्या जवळ आणखी Motivational charoli in marathi, जीवनावर मराठी चारोळ्या, chandrashekhar gokhale charoli असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

आम्हाला आशा आहे की Marathi Charolya, Marathi Charolya on life, Motivational charoli in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

Leave a Comment