मित्रांनो लग्न असो किंवा मकर संक्रांती किंवा डोहाळे जेवण आपल्याला उखाणा घेतल्याशिवाय समारंभ संपन्न होत नाही तर आज मी तुम्हाला navardev ukhane, Romentic Marathi Ukhane Male, नवरदेवाचे उखाणे, navardevache ukhane, Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Groom सांगणार आहे
Table of Contents
Marathi Ukhane for Male | पुरुषांसाठीचे मराठी उखाणे
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, … आज पासुन माझी गृहमंत्री.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात,
पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर … माझी प्यारी.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप, … मिळाली आहे मला अनुरुप.
आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, … चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
… माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.
श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, … गेली माहेरी की होतात माझे हाल.
चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, … चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, … च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा, …चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय, … ला आवडते नेहमी दुधावरची साय,
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, … आहे माझे जीवन-सर्वस्व.
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, … मुळे लागली मला संसाराची गोडी.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
Marathi ukhane for male romantic
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.
मातीच्या चुली घालतात घरोघर, … झालीस माझी आता चल बरोबर.
शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, … राणी मिळाली स्वर्ग आला होता.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात.
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, .. चे रुप आहे अत्यंत देखणे.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………… चे नाव घेतो……..च्या घरात.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, … चे नाव घेतो लग्नाच्या राती.
भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, … चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
Navardevache ukhane | नवरदेवाचे उखाणे
संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, … माझ्या जीवनाची सारथी.
पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे,
उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी,
आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान, …चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, … शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, … सोबत जीवनात मला आहे आनंद.
कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.
जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी,
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
लग्नाचा वाढदिवस करु साजरा, .. तुला आणला मोग-याचा गजरा.
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,
सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
Funny marathi ukhane for the groom | मराठी विनोदी उखाणे
तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार … च्या गळ्यात.
भाजीत भाती मेथीची, … माझी प्रितीची,
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
दही चक्का तुप, … आवडते मला खुप.
नंदनवनात अमृताचे कलश, … आहे माझी खुप सालस.
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन,
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, … बरोबर बांधली जीवनगाठ.
प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, … झाली आता माझी सहचारिणी.
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग,
Laksh Laksh Divyasarakhe Ujalat Rahte Eknishtha Prem, ……..Chi Majhya Hrudayat Korali Geli Ekmev Frem.
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.
Sitesarakh Charitra, Lakmi Sarkh Rup, ………….Mala Milali Aahe Anurup.
वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, … आहे माझी सर्वा पेक्षा,
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,
चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.
श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, … च्या सोबत आदर्श संसार करीन.
आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे… करी पुजन.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
Marathi ukhane navardev | नवरदेव मराठी उखाणे
राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास,
मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,
अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.
जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.
Kahi Shabd Yetat Othatun, …..Cha Naav Yet Matra Hrudyatun.
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.
Kolhapurla Aahe Mahalakmicha Vas, …… Mi Bharavito Jalebi Cha Ghas.
चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
Bhajit Bhaji Methichi, …………Majhya Pritichi.
चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा, … रावाच्या जीवावर … मारते मौजा.
Puranpolit Tup Asave Sajuk, …… Aahet Aamchya Far Najuk.
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.
आता Marathi Ukhane for male for Whatsapp and Facebook सर्व navardevache ukhane व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील navardev ukhane इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात.
तुमच्या जवळ आणखी Marathi Ukhane for Groom, Marathi Ukhane for male असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
आम्हाला आशा आहे की Marathi ukhane for male, marathi ukhane funny for maleतुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग family, मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.