60 Pu la Deshpande quotes | पुल देशपांडे सुविचार | Pula Deshpande Quotes on Maitri

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून pu la deshpande quotes on maitri, pu la deshpande quotes on life संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे pu la deshpande quotes कलेक्शन आवडल असेल, जर पुल देशपांडे सुविचार आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  http://maharashtrian.in/ ला आवशय भेट दया

Pu la deshpande quotes | पुल देशपांडे सुविचार

माणसाला माणूस
जोडत गेलं पाहिजे

बोलायला कुणीच नसणं
यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं
ही शोकांतिका जास्त भयाण

माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर?
याची त्याला भिती वाटते

सगळे वार परतवता येतील पण
अहंकारावर झालेला वार
परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही

आयुष्य फार सुंदर आहे…
ते फक्त चांगल्या विचारांनी
जगता आलं पाहिजे

pu la deshpande quotes on maitri
pu la deshpande quotes on maitri

कोणत्याही सुखाच्या क्षणी
आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

आपलाही कोणाला
कंटाळा येऊ शकतो ही
जाणीव फार भयप्रद आहे.

खर्च झाल्याचं दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास होतो.

pu la deshpande quotes
pu la deshpande quotes

रातकिडा कर्कश ओरडतो
यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो
कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.
पण तुळस वृंदावनातच राहते.
तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं

क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते

Pu la deshpande quotes on maitri | मैत्रीवर पु ला देशपांडे कोट्स

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात.
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणसं.
या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की
त्याचे सर्टिफिकेट होते

भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे.

शेवटी काय हो,
आपण पत्त्याच्या नावाचे धनी,
मजकुराचा मालक निराळाच.

भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे.

पुल देशपांडे सुविचार
पुल देशपांडे सुविचार

जगात काय बोलत आहात
ह्यापेक्षा कोण बोलत आहात
ह्याला जास्त महत्त्व आहे.

काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे  मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.

माणसाचे “केस गेलेले” असले
तरी चालतील
पण
माणुस हा “गेलेली केस”
असु नये

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो,
त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते

“कुणीसं म्हटलयं – कसा मी ? कसा मी ?
जसा मी तसा मी असा मी असामी!…
खर सांगू का?
हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही.
मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय
तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे.
जगात काय म्हटलयं यापेक्षा
कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे
हे मला कळून चुकलंय.”

Pu la deshpande quotes on life | पु ला देशपांडे जीवनाचे कोट

जाळायला काही नसलं की
पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.

आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो.
उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा,
पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य,
चित्र, संगीत, नाट्य, शिल्प,
खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील,
पण कलेशी जमलेली मैत्री
तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.

परिस्थिति हा
अश्रूंचा कारखाना आहे!.

pu la deshpande quotes on life
pu la deshpande quotes on life

झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही.
माझीच नव्हे, कुणाचीच नाही!
मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे?
शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय?
हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो.
आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते.
प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते.
विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!

जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे.

प्रयास हा
प्रतिभेचा प्राणवायू आहे

मराठीला जी ‘मज्जा संस्था’ वाटते, तीच इंग्रजीला ‘नर्व्हस सिस्टीम’ वाटते. फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे

आम्हाला आशा आहे की pu la deshpande quotes on maitri, pu la deshpande quotes on life तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग पुल देशपांडे सुविचार share करायला विसरु नका.

Leave a Comment